गडचिरोलीत नक्षली कारवाया रोखण्यात भाजप शिवसेना सरकार अपयशी

08 Feb 19 |

महिनाभरापासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसातल्या हिंसाचाराच्या घटना पाहता जिल्ह्यात सरकार व प्रशासन अस्तित्वात आहे का हाच मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. २१ जानेवारीला भामरागड तालुक्यातील तिघांची पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून हत्या, २६ जानेवारीला एटापल्ली तालुक्यातील व ३० जानेवारीला भामरागड तालुक्यातील दोघांचे अपहरण करून हत्या, ३१ जानेवारीला कोरची व धानोरा तालुक्यात सात वाहनांची जाळपोळ, २ फेब्रुवारीला धानोरा तालुक्यात पुन्हा दोन हत्या असे हे हिंसाचाराचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे गडचिरोलीत सरकारचा वचक राहिला नसून कायदा सुव्यवस्था राखण्यात फसणवीस सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.